विश्वासाने प्रभु येशूच्या Lyrics
विश्वासाने प्रभु येशूच्या वस्त्राला मी शिवले ग
उदास माझे जगने अवघे ,पुन्हा नव्याने हसले ग
घेऊन आपल्या चिंता व्याधि
येशु भवति जमली गर्दी
मी ही गेली समीप अगदी
अघटित तेव्हा घडले ग
उदास माझे जगने अवघे
वर्ष गेली अशीच बारा
विकार माझा झाला न बरा
देव जगाचा येशुच खरा
आजाराला कळले ग
उदास माझे जगने अवघे
भीत भीत मी पूडते गेले
म्ह्टले येशु मी तुज शिवले
क्षणात दुखने पसार झाले
सुख डोळ्याला दिसले ग
उदास माझे जगने अवघे
कोण खरोखर मजला शिवले
शक्तिहीन मज़ पुरते गमले
तेव्हा प्रभुने शिष्यास पुसीले
तेव्हा काळीज खिजले ग
उदास माझे जगने अवघे
Shop Now: Bible, songs & etc
1. Follow us on our official WhatsApp channel for the latest songs and key updates!
2. Subscribe to Our Official YouTube Channel
Keywords: Tamil Christian song lyrics, Telugu Christian song lyrics, Hindi Christian song lyrics, Malayalam Christian song lyrics, Kannada Christian song lyrics, Tamil Worship song lyrics, Worship song lyrics, Christmas songs & more!
Disclaimer: "The lyrics are the property and copyright of their original owners. The lyrics provided here are for personal and educational purposes only."
